नागपूर : बांधकाम प्रक्रीयेला मंजुरी देण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या बीटीएमएस सॉप्टवेअरमध्ये आर्किटेक्ट व बिल्डरांना अडचणी येत आहे. त्यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांना निवेदन सादर केले. त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (ता.१९) स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा व प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षामध्ये बैठक आयोजित केली.
या बैठकीला नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, नगररचना विभागाचे श्रीकांत देशपांडे, प्रफुल्ल फरकासे यांच्यासह क्रिडाईचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा आणि प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी क्रिडाई व आर्किटेक्टांना येणा-या बांधकाम मुंजुरीसाठी येणा-या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यामध्ये अधिग्रहण प्रमाणपत्र घेण्यासाठी होणारा उशीर, स्ट्रक्चरल स्थिरता प्रमाणपत्र, सिक्युरिटी डिपॉजिट यासारखे अनेक विषयांवर त्यांना समस्या येत असतात. यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यात याव्यात, अशी मागणी क्रिडाईने केली आहे. याव्यतिरिक्त शासनाने बांधकाम मुंजुरीसाठी ऑनलाईन अर्जसादर करण्यासाठी तयार करण्यात आलेले बीटीएमएस सॉप्टवेअरमध्ये अडचणी येत आहेत, त्यावरही तोडगा काढण्यात याव्यात, अशी मागणी क्रिडाईने केली आहे.
यावर बोलताना प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे म्हणाले, कायद्याच्या चौकटीत बसून मंजुरी देण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने येणा-या अडचणीसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सॉप्टवेअर अद्ययावत प्रक्रीया दोन तीन महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर कोणतिही अडचण येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
अधिक वाचा : गरिबांची सेवा हीच खरी मानव सेवा : आ.डॉ. मिलींद माने