नागपूर : गेले काही दिवस नागपुरात स्थिर असलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संख्येत शुक्रवारी पहाटे ६ ने वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपुरात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २५ वर पोहोचली आहे. नागपुरातील सतरंजीपूरा येथे कोरोनाची लागण झाल्याने रविवारी दगावलेल्या एका ज्येष्ठ रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी पहाटे स्पष्ट झाले.
सहा जणांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता १९ वरून थेट २५ वर पोचली आहे. या सर्वांवर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातल्या वॉर्ड क्रमांक २५ मधील आयसोलेसन वॉर्डात उपचार सुरू आहे. सतरंजीपूरा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला ८ ते १२ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुले आणि २२ ते ३५ वयोगटातला चार तरुण नातेवाईकांचा समावेश आहे.
Also Read- योद्धा बना, समाजाचे शत्रू नाही ! मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन : मास्क वापरणे आता बंधनकारक