SSR प्रकरणात मोठी अपडेट! Drug Case मध्ये मुंबईत पुन्हा NCBची छापेमारी, दोघांना अटक

sushant singh rajput

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने मुंबईतील अनेक भागात छापेमारी केली आहे. NCB ने मंगळवारी रात्री मुंबईतील लोखंडवाला, अंधेरीसह विविध भागात ही छापेमारी केली.

मुंबई, 02 जून: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला (Sushant Singh Rajput Death Case) याच महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. 14 जून रोजी त्याचा मृतदेह त्याच्याच राहत्या घरात आढळला होता. या घटनेनंतर विविध तपास संस्थांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी असंख्य अँगलनी या केसचा तपास केला. दरम्यान सुशांतच्या मृत्यूनंतर काही महिन्यातच यामध्ये ड्रग कनेक्शन समोर आलं होतं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (Narcotics Control Bureau) अद्याप त्याप्रकरणी तपास सुरू आहे. याबाबतीतच एक महत्त्वाची अपडेट मुंबईतून समोर येते आहे. मुंबईतील काही भागात एनसीबीने (NCB raid in Mumbai) पुन्हा एकदा छापेमारी केली आहे.

सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने मुंबईतील अनेक भागात छापेमारी केली आहे. NCB ने मंगळवारी रात्री मुंबईतील लोखंडवाला, अंधेरीसह विविध भागात ही छापेमारी केली. NCB ने याप्रकरणी दोन मोठ्या ड्रग्ज पेडलरना (2 Drug Peddler Arrested in Sushant Singh Rajput Case) अटक देखील केली आहे. हरीश खान आणि त्याचा भाऊ साकिब खान या दोघांना वांद्रे याठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. सुशांत सिंह ड्रग्ज केसमध्ये ड्रग (SSR Case Drug Connection) सप्लाय केल्याचा आरोप या दोघा भावांवर आहे.

सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. पण, बराच तपास केल्यानंतरही हाती काहीच लागले नाही. अचानक त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested) याला हैदराबादमधून अटक करण्यात आली, त्यामुळे या प्रकरणाची दिशाच बदली आहे. आधी मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास केला. त्यानंतर राजकीय धुरळा उडाल्यानंतर हा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने मुंबईत येऊन नव्याने तपास सुरू केला. आता वर्षभरानंतर सुशांतचा रूममेट सिद्धार्थाला अटक केली आहे.

एका सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केल्यामुळे सिद्धार्थ एनसीबीच्या रडारवर आला होता. सुशांतच्या निधनानंतर त्याने आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करून टाकले होते. आता अलीकडेच त्याने नवीन अकाऊंट सुरू केले आहे.

काही दिवसांपूर्वी NCB ने सुशांतचा जवळचा मित्र आणि त्याचा सहकारी सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani Arrested) याला अटक केली होती. गेल्यावर्षी सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ पिठानी हे नाव वारंवार समोर आलं होतं. आता पुन्हा एकदा त्याचं नाव चर्चेत आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने सिद्धार्थला हैदराबाद याठिकाणाहून अटक (NCB Arrested Siddharth Pithani in Sushant Singh Rajput Case) केली आहे.