नागपूर : सक्करदरा ठाण्यांतर्गत आदर्शनगरात झालेल्या गोळीबारात एक युवक गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला मोठी जखम असून रक्तबंबाळ स्थितीत तो खाली पडून होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास गॅस गोदामाच्या गल्लीत घडली.
उमेश ढोबळे (३५), रा. राहुलनगर, सोमलवाडा असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती qचताजनक आहे. तो अविवाहित असून घरोघरी पालेभाज्या पोहोचविण्याचे काम करतो. या घटनेचा अद्यापही प्रत्यक्षदर्शी मिळालेला नाही. पोलिस त्या मार्गावरील सीसीटिव्ही चित्रीकरण तपासत आहेत. लवकरच या घटनेचा छळा लागेल, अशी शक्यता वर्तविली जाते.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या सुमारास एका दुचाकी वाहनावर तिघेजण आले. त्यांनी आदर्शनगर, गॅस गोदामाजवळील एका गल्लीत वाहन पार्क केले. काही वेळातच उमेशला जखमी करून दोघे घटनास्थळाहून पसार झाले. उमेश दुचाकीजवळ रक्तबंबाळ स्थितीत पडून होता. दुपारच्या सुमारास गोळीबाळाचा आवाज झाल्याची परिसरात चर्चा आहे. घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. अपर पोलिस आयुक्त सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय qशदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने, बेलतरोडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांच्यासह सक्करदरा ठाण्यातील पोलिस पथक पोहोचले. उमेशला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईकांना देण्यात आली. उमेशवर गोळी झाडली की आणखी काय? त्याला बळजबरीने आणण्यात आले? वाद कशाचा? हीच जागा का निवडली. या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासात येतील. परिसरात चर्चेला ऊत आला आहे.
मित्रावर हल्ला परंतु वाद कशाचा
उमेश आणि आरोपी मित्र आहेत. तिघेही उमेशच्या दुचाकीवर आले होते. त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून वाद होता. यावर चर्चा करण्यासाठीच निघाले होते. मात्र, नियोजित कटाची उमेशला जाणीव नव्हती. वाद विकोपाला जाताच उमेशच्या डोक्यावर गोळी झाडून आरोपी फरार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अशी पटली ओळख
उमेश हा रक्तबंबाळ स्थितीत गॅस गोदामाजवळील गल्लीत पडून होता. त्याच्याजवळ मोबाईल, आधार कार्ड मिळाले. यावरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना सूचना दिली.