उघड्यावर झोपणाऱ्या बेघर निराधारांना दिला निवारा

Date:

नागपूर : थंडीच्या दिवसांमध्ये कुडकुडत उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना मनपाच्या बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. महापालिका समाजकल्याण व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पुढाकाराने अशा बेघरांना पोलिस वाहनांतून बेघर निवाऱ्यापर्यंत सोडण्याची सोय करण्यात आली आहे. थंडीमुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी महापालिका व पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागातर्फे संयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरात रात्रीच्या वेळी उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना पोलिस वाहनांद्वारे बेघर निवारा केंद्रापर्यंत पोहोचविण्यात येत आहे. त्यामुळे नागपूर शहरातील रेल्वे उड्डाणपूल, रस्ते, फुटपाथ, हॉटेल, खुले पटांगण, बसस्थानक, रेल्वेस्थानक या ठिकाणी यापुढे बेघरांना उघड्यावर राहण्याची गरज पडणार नाही. निवारागृहात् पाणी, स्वच्छतागृह, गादी, चादर, ब्लँकेट आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. ‘बेघर फ्री सिटी’ अभियानाच्या यशस्वीतेकरीता मनपा अप्पर आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीमती संखे, प्रमोद खोब्रागड़े, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांचेसह सामाजिक सुरक्षा पोलिस विभाग, मनपा समाज कल्याण विभाग तसेच स्वयंसेवी संस्थेचे कर्मचारी कार्य करीत आहेत.

अधिक वाचा : नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

International Dance Day 2024 : Date History Significance Wishes & Quotes..

April 29th of every year is known as World...

Complex Thumb Re-plantation Surgery at Krims Hospital – A Remarkable Medical Achievement

Nagpur: A remarkable medical feat unfolded at KRIMS Hospital...

10 Best Cafe Restaurants in Nagpur 2024

Nagpur, a city in Maharashtra, is well-known. It's not...