कुख्यात गुन्हेगार किशोर सोलंकीला अटक

Date:

नागपूर : गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हवा असलेला कुख्यात गुन्हेगार किशोर सोलंकी याला शांतीनगर पोलिसांनी शुक्रवारी सापळा रचून जुना कामठी रोड येथून ताब्यात घेतले. किशोर हा कामठी रोडवरील शनी मंदिराजवळच्या देशी दारू भट्टीजवळ असल्याची टिप शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली असता त्याने शांतीनगर आणि तहसील पोलिस ठाणे परिसरात केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली. कुख्यात किशोर हा गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना हवा होता. पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलिस आयुक्त वालचंद मुंडे, वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुधीर बघेल, हवालदार अब्दुल वकील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अधिक वाचा : टायर चोरांची आंतरराज्यीय टोळीला अटक

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related