नागपुर : उपराजधानीत देह व्यापाराचे जाळे दिवस न दिवस पसरत चालले आहे, हे होत असतांना पुन्हा एकदा शहरा लगत असलेल्या कामठी जवळील रनाळा येथे लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली असून झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कार्रवाइत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली.
प्राप्त माहिती नुसार झोन पाचच्या पोलीस दलाला दोन युवक महिला कडून देहव्यापार करुण घेत असल्याची माहिती मिळाली. ते दोघे रनाळा येथील हॉटेल रिलॅक्स लॉजिंग अॅण्ड बोर्डिंगमध्ये देहव्यापारासाठी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला असता या अड्ड्याचा सूत्रधार मोंटू आहे, तर सोनू ऑटोचालक आहे असे कळले.
सोनूने ऑटोमध्ये एक तरुणी आणि १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आणून त्याने दीड हजार रुपयात डमी ग्राहकासोबत सौदा केला. त्या ग्राहकाकडून हॉटेलच्या मॅनेजरने खोलीच्या भाड्याचे एक हजार रुपये घेतले. कुठल्याही कागद पत्राची पाहणी न करता हॉटेलची खोली उपलब्ध करून दिली. डमी ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी धाड टाकून तिघांनाही अटक केली, ऑटोमध्ये बसलेल्या मुलीची विचारपूस केली असता ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. तर देहव्यापार करीत असलेली तरुणी विवाहित असून ती तीन वर्षांपासून या धंद्यात आहे.
सय्यद सरफराज ऊर्फ सोनू अली सय्यद आसिफ अली (२७) रा. इतवारी स्टेशन, मोंटू बाबुराव ठाकूर (३१) रा. कोहिनूर लॉनजवळ वाठोडा आणि अभिषेक रमेश पाटील (३१) रा. कामठी अशी आरोपीची नावे आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक देह व्यापार विरोधी कायदा (पीटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापू ढोरे, एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीएसआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, मृदुल नगरे, रवींद्र राऊत आणि सुजाता यांनी केली.
अधिक वाचा : कामठी येथून ४६ किलो गांजा जप्त, तिघांना अटक