जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या फ्रेजरपुरा येथील 65 वर्षीय महिलेचा व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुबगाव येथील 62 वर्षीय पुरूष व्यक्तीचा जिल्हा कोविड रुग्णालयात, तर अमरावतीच्या अंबापेठेतील 85 वर्षीय पुरुष व्यक्तीचा सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अमरावतीतील मांगीलाल प्लॉटमधील 92 वर्षीय पुरूष व्यक्तीचा झेनिथ हॉस्पिटलमध्ये, तर छाया कॉलनीतील 75 वर्षीय पुरुष व्यक्तीचा जिल्हा कोविड रूग्णालयात मृत्यू झाला.
तळेगाव येथील 53 वर्षीय पुरूष व्यक्तीचा पीडीएमसी रुग्णालयात, अचलपूरच्या बापापुरा परिसरातील 57 वर्षीय पुरूष व्यक्तीचा एक्झॉन रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण मयत कोरोनाबाधितांची संख्या 540 वर पोहोचली आहे.