नागपुर :- शाळेत मुलांचा मनातील छड़ी चा धाक आता संपणार आहे कारण राष्ट्रीय बाल हक्क व संरक्षण आयोगालाही या छड़ी चा धाक वाटल्याने त्यांनी देशातील प्रत्येक शाळांमधून आता मुलांना देण्यात येणाऱ्या छडीच्या शिक्षेवरच बंधन घातले आहे.
शाळांमधील प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी आयोगाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात छडीच्या शिक्षेवर बंधन घालण्यात आले आहे. यासाठीची अंमलबजावणी सर्व शाळांनी करण्यासाठी आदेशही जारी केले आहेत. यामुळे देशातील कोणत्याही शाळेत आता गुरुजीच्या हातातून छडी कायमची गायब होणार आहे.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या या निर्णयाचे काही पालकांनी स्वागत केले असले तरी याविरोधातील पालक मोठ्या प्रमाणात समोर येण्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. बालकांना छडी मारणे हे अमानुषपणाचे आहे. याबद्दल दुमत नाही, परंतु मुलांना स्वयंशिस्त लावण्यासाठी काही तरी धाक असला पाहिजे. काही श्रीमंत शाळांतील पालकांना छडीचा विरोध असेल परंतु सर्वसामान्य पालकांना ही छडी शिक्षकांच्या हाती राहावी, असेच मत असल्याचे राज्य मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी ईनाडू इंडियाशी बोलताना व्यक्त केले.
नवीन दिल्ली येथील राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शिक्षण बाल हक्क कायदा 2009 च्या अनुच्छेद-17 नुसार कोणत्याही मुलांना शारिरीक वा मानसिक छळाला सामोरे जावे लागू नय, यासाठीची तरतूद केल्याचा दाखला देत शाळांमधून छडी कायमची हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशातील सर्व शिक्षण विभागाला आदेश दिले असून त्या पार्श्वभूमीवर आज प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना यासाठीची कार्यवाही करण्याचे आदेश जारी केले आहेत.
राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने शाळांमधून छडीची शिक्षा वगळण्याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या असून त्यानुसार छडीची शिक्षा ही मुलांना देण्यापासून रोखण्याचा या सूचनेत देण्यात आला आहे.
अधिक वाचा : Prakash Javadekar announce JEE to be conducted twice every year