स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आतापर्यंत तुम्ही फक्त 8 किंवा 10 वेळेस ATM वरून फ्री ट्रान्झॅक्शन करू शकत होता. पण- अट ठेवली आहे. या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्यात एक ठराविक रक्कम ठेवावी लागेल.
SBI कडून सांगण्यात आले आहे की, जे अकाउंट होल्डर 25,000 रुपये मंथली अॅव्हरेज बॅलेंस ठेवतील त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया ग्रुपच्या कोणत्याही ATM वरून दर महिन्याला 10 फ्री ट्रान्झॅक्शंसची सुविधा मिळतील. पण यासाठी काही अटी आहेत. जे ग्राहक 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मंथली अॅव्हरेज बॅलेंस मेंटेन करतील त्यांच्यासाठी दूसऱ्या बँकेच्या ATM वरून अनलिमिटेड फ्री ट्रान्झॅक्शंस करता येईल.
जर तुम्ही SBI चे रेगुलर सेव्हिंग्स बँक अकाउंट होल्डर आहेत तर, महानगरात तुम्हाला 8 फ्री ATM ट्रान्झॅक्शंस दर महिन्याला करता येईल. यात 5 ट्रान्झॅक्शंस SBI ATM आणि 3 ट्रान्झॅक्शंस दुसऱ्या बँकेच्या ATM वरून करू शकता. नॉन-मेट्रो खाते धारकांसाठी ही लिमीट 10 फ्री ट्रान्झॅक्शंस (5 SBI आणि 5 इतर बँकेचे ATM ) दर महिना करता येईल.
Read Also : 50% ATMs In India May Shut Down By March Next Year!