नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

Date:

नागपुर: करोना विषाणूच्या संसर्गाचे हब ठरत असलेल्या पूर्व नागपुरातील सतरंजीपुरात शनिवारी आणखी चौघांना लागण झाली. यातील तिघे हे करोनामुळं दगावलेल्या रुग्णांचे नातेवाईक आहेत. हे तिघे आजारी रुग्णांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या खेरीज मोमिनपुरा येथील नव्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. कोणाच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली, याचा शोध घेतला जात आहे. नव्या रुग्णांमध्ये नागपुरातील बाधितांचा आकडा आता ६३ वर पोचला आहे.

करोनाचा शनिवारी नव्याने प्रादुर्भाव झालेल्या सतरंजीपुरा येथील रहिवाशांमध्ये २३ आणि २९ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष आणि मोमिनपुरा येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी सतरंजीपुरा येथील तिघेही करोना बाधिताच्या निकट सहवासात आलेल्यांपैकी आहेत. दगावलेल्या बाधित रुग्णाचे नातेवाईक असलेल्या या चौघांनाही करोनाच्या संशयावरून आमदार निवासातील सक्तीच्या एकांतवासात ठेवण्यात आले होते.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू प्रयोगशाळेत शनिवारी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासले गेले. त्यात करोना विषाणूचा अंश आढळून आला. त्यामुळे करोनाची लागण झाल्यानंतर दगावलेल्या सतरंजीपुरातील एकट्या रुग्णाच्या सहवासात आल्याने प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या आता ३४ वर पोहोचली आहे. एका रुग्णांमुळे इतक्या लोकांना संसर्ग झाल्यामुळं मध्य भारतातील ही सर्वांत मोठी संसर्ग साखळी ठरली आहे.

Also Read- कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी बाजारात १ लाख कोटींची तरलता

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related