भारताची आघाडीची खेळाडू सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत यांनी आपापल्या सामन्यांमध्ये विजय मिळवत बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पुढच्या फेरीत आगेकूच केली.
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्य व कांस्यपदक विजेता सायनाने तुर्कीच्या आलिये देमिरबैगला दुसर्या फेरीत 21-17, 21-8 असे नमविले. पुढच्या फेरीत तिची गाठ 2013 ची चॅम्पियन थायलंडच्या रेचनॉक इंटॅनॉनशी होणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेता सायना नेहवाल ला पहिल्या फेरीत चाल मिळाली होती. पाचव्या मानांकित श्रीकांतनेदेखील आयर्लंडच्या एनहात एंगुयेनला 21-15, 21-16 असे पराभूत केले.
भारताचा एच. एस. प्रणॉय, समीर वर्मा आणि बी. साईप्रणित यांनीदेखील पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला. साईप्रणितने कोरिया सोन वान हो विरुद्धच्या लढतीत वॉकओव्हर मिळाला. गेल्या सत्रात चार जेतेपद मिळवणार्या श्रीकांतचा सामना स्पेनच्या पाब्लो एबियनशी होणार आहे. तर, प्रणित स्पेनच्या लुईस एनरिक पेनालवेरशी खेळणार आहे.
सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी व अश्विनी पोणप्पा जोडीने 15 व्या मानांकित जर्मनीच्या मार्क व इसाबेल जोडीला 10-21, 21-17, 21-18 असे पराभूत करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. त्यांची गाठ सातव्या मानांकित मलेशियाच्या गोह सून हुआत व शेवोन जॅमी लाईशी होणार आहे.
रशिया ओपन स्पर्धेतील रौप्यपदक विजेता रोहन कपूर व कुहू गर्ग जोडीला सहाव्या मानांकित इंग्लंडच्या क्रिस एडकाक व गॅब्रिएल एडकाक मिश्र दुहेरी लढतीत 21-12, 21-12 असे नमविले. पुरुष दुहेरीत अर्जुन एम. व रामचंद्रन श्लोक जोडीला मलेशियाच्या ओंग यु सिन व तियु ई यी ने 21-14, 21-15 असे पराभूत केले. तर, तरुण कोना व सौरभ शर्मा जोडीला पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या ओर चिन चुंग व तांग चुन मॅन जोडीकडून 20-22, 21-18, 17-21 असे नमविले.
अधिक वाचा : Four girls from Maharashtra to represent India in SAFF U-15 Women’s Championship