Russia-Ukraine war Live Updates : रशियन सैन्याची युक्रेनमध्ये धडक; अनेक शहरांमध्ये स्फोट

Russia-Ukraine war Live Updates

Russia-Ukraine war Live Updates : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अखेर युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. त्यांनी युक्रेनच्या सैन्याला शरण या असा इशारा दिला आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी पहाटे संबोधित करताना म्हटले आहे की रशिया पूर्व युक्रेनमध्ये विशेष लष्करी ऑपरेशन करेल. याबाबतचे वृत्त एपी आणि बीबीसीने दिले आहे.

रशियाने डोन्बास प्रांतात लष्करी कारवाई सुरू केल्यामुळे अखेर युद्ध सुरू झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे. पुतीन यांनी इतर देशांना इशारा देताना म्हणाले की, “रशियाच्या कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांची काही खैर नाही”. दरम्यान युक्रेनची राजधानी कीवमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या सैन्याला शरणागती पत्करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर या युद्धात हस्तक्षेप करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा पुतीन यांनी इतर देशांना दिला आहे.

Russia-Ukraine war Live Updates : रशियन सैन्याची युक्रेनमध्ये धडक; अनेक शहरांमध्ये स्फोट

कीव विमानतळावरून प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलवले

ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज गुरुवारी सकाळी युक्रेनमध्ये लष्करी कारवाईची घोषणा केली. याचे पडसाद आज भारतीय शेअर बाजारात उमटले. शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) तब्बल २ हजार अंकांनी कोसळला. तर निफ्टी (Nifty) ६०० अंकांनी खाली आला. दरम्यान, ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती २०१४ नंतर प्रथमच प्रतिबॅरल १०० डॉलरवर पोहोचल्या आहेत. बिटकॉईन, इथेरियम. डोगेकॉईन या क्रिप्टोकरन्सीमध्ये प्रत्येक ५ टक्क्यांनी घसरण झाली आहे.

पुतीन यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला. सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांना काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा (Investors lost) फटका बसला. यामुळे शेअर बाजारातील मागील सत्रातील २५५.६८ लाख कोटींच्या तुलनेत गुंतवणूकदारांची संपत्ती २४८.०९ लाख कोटींवर घसरल्याने बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे (BSE listed) भांडवली मुल्य ७.५९ लाख कोटींनी कमी झाले आहे. टाटा स्टील, भारती एअरटेल, इंडसइंड बँक आणि टेक महिंद्राचे शेअर्स सेन्सेक्सवर सर्वाधिक ३.९६ टक्क्यांपर्यंत घसरले.