नागपूर : शहरातील रेल्वे स्थानकाच्या जनरल मिटिंग रुममध्ये ९ किलो ९०० ग्रॅम गांजा आढळून आला आहे. ‘आरपीएफ‘च्या विशेष गुन्हे शोध पथकाने हा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी २ आरोपींना अटक केली आहे. वसीम इस्लामउद्दीन आणि मुजफ्फर मोहम्मद अशी त्यांची नावे आहेत. महिन्याभरातील मादक पदार्थासंबंधीची ही चौथी यशस्वी कारवाई आहे.
नागपूर रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांमधून अनेक वेळा गांजाची तस्करी केली जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दक्षिण जलदगती रेल्वेमधून अनेक वेळा गांजाची मोठी तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. आज नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वरील जनरल वेटिंग रुमजवळ २ जण संशयितरित्या वावरत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी त्यांची झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये ९ किलो ९०० ग्रॅम गांजा आढळून आला. या दोघांना आरटीओ पुणे यांनी ताब्यात घेतले. यामध्ये वसीम इस्लामउद्दीन आणि मुजफ्फर मोहम्मद यांचा समावेश आहे. दोन्ही आरोपी उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत. दक्षिण जलदगती रेल्वेमधून गांजा आणला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.
अधिक वाचा : नोकरीचे आमिष दाखवून साडेअकरा लाखांनी फसवणूक