नागपूर : उपराजधानीच्या तरुणांचे आवडते ठिकाण असलेल्या फुटला चौपाटीवर शनिवरी हजारो नागरिकांनी एक सूर – तालात राष्ट्रगीत म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर तिरंग्याला एकतेची आगळी वेगळी सलामी दिली. यावेळी ढोलताशाच्या व शंखनादाच्या आवाजाने संपूर्ण फुटाळा परिसरात आसमंत निनादला.
‘एक वादळ भारताचं‘ या चळवळी तर्फे थरार राष्ट्रगीताचा या उपक्रमा अंतर्गत तरुणांनी दिल्लीच्या राजपथा ची प्रतिकृती उभारण्यात यश मिळवले. हजारो नागपूरकर या क्षणाचे साक्षी झाले.
मुख्य म्हणजे कोणताही औपचारिक कार्यक्रम न राबवता उत्स्फूर्तपणे राबविण्यात आलेल्या उपक्रमाला लोकांनी स्वतः भरभरून प्रतिसाद दिला.
सकाळी ९ वाजता ‘आम्ही मराठी’ ढोल ताशाच्या पथकाच्या गजरात अभियानाची सुरवात झाली. ढोलताशाच्या व शंखनादाच्या आवाजाने संपूर्ण फुटाळा परिसर चैतन्यपूर्ण भासत होता. सर्वत्र देशभक्तीचा उत्साह संचारला होता. सर्व भावनिक व धार्मिक ठिकाणी ध्वजवंदन व राष्ट्रगीत साजरे व्हावे यासाठी ‘एक वादळ भारतचं’ जनजागृती कार्यरत आहे. शनिवारी उपक्रमा अंतर्गत मध्यप्रदेश व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील ३६ ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात सहभागी होऊन लाखो नागरिकांनी राष्ट्रगीताचा थरार अनुभवला. उपक्रमासाठी विविध संस्थांचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा : अटल महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन : ५० हजारांवर रुग्णांनी घेतला लाभ