नागपूर, ता. १३ : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रसार बघता नागपूर महानगर पालिकेतर्फे संचालित ‘आपली बस’ मध्येही खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे.
यासंदर्भात परिवहन सभापती नरेंद्र (बाल्या बोरकर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपली बस हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माध्यम आहे. यामध्ये अनेक प्रवासी असतात. या प्रवाशांनी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याची माहिती देणारे पत्रके बसच्या दर्शनी भागात लावण्यात येत आहे. खबरदारी म्हणून पहाटे ४ ते ६ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत सुमारे ३६५ बसेसमध्ये ३५ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून औषधांची फवारणी करण्यात येत आहे. बसमधील चालक आणि वाहक यांना मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आला आहे.
कोरोनावर काळजी हाच उपाय असून कुणालाही घाबरण्याची गरज नाही. शासन निर्देश आणि वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिलेल्या सूचनेनुसार नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
Also Read- नागपुरकरांचा मेट्रो प्रवास आणखी सुखकर होणार