महात्मा गांधी यांची यंदा १५० वी जयंती संपूर्ण देशभर साजरी करण्यात आली असून जयंती निमित्त नागपूर मध्यवर्ती कारागृहात गांधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
शासनाने यंदा महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त कारागृहातील जन्मठेप भा.द.वि. कलम ३७६, ३९२, ३९७ इ. कालमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या बंद्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित कालमाअंतर्गत शिक्षा भोगत असलेले जे बंदी आहेत व ज्यांनी एकूण शिक्षेच्या ६६% शिक्षा कारागृहात भोगली आहे त्यांना शिक्षेच्या कालावधीत सूट देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत.
त्या अनुषंगाने नागपूर मध्यवर्ती कारागृहातील शिक्षाधीन बंदी नामे सलाम अजीज शेख हा उर्वरित कालावधीत सूट मिळण्यास पात्र ठरत असल्याने त्यास आज दि. ५/१०/२०१८ रोजी कारागृहातून मुक्त करण्यात येणार आहे.
कारागृहातील बंदी हे सुद्धा समाजाचे एक घटक असतात पण कळत न कळत त्यांच्या हातून गुन्हा घडल्यामुळे ते कारागृहात बंदी झाले. महात्मा गांधी यांनी अंगिकारलेल्या सत्य अहिंसा मार्गावर जाण्याची त्यांना एक संधी मिळावी व नव्या उमेदीने त्यांनी आपला जीवनक्रम सुरु करावा यासाठी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त विशेष माफीचा लाभ भेटलेला बंदी सलाम अजीज शेख यांच्या हस्ते कारागृहातून सुटताना महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. व त्यास मा. श्री. योगेश देसाई यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित असलेले पुस्तक भेट देण्यात आले.
अधिक वाचा : दोन अवैध दर्गे ४८ तासांत हटवण्याचे आदेश