नोंदणी करणे अनिवार्य; 18 वर्षावरील तरुणांना नोंदणी न करता लस मिळू शकणार नाही

India registers more than 3.8 lakh daily cases, becomes fastest country to exceed 16 Crore vaccinations

कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेदरम्यान 18 वर्षांवरील सर्व लोकांना 1 मेपासून लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असून, यासाठी नोंदणी 28 एप्रिल म्हणजेच आजपासून सुरू होत आहे. या नव्या यंत्रणेसंदर्भात केंद्र सरकारने नवीन धोरण तयार केलेय. 18 ते 45 वर्षे वयोगटातील तरुणांना नोंदणी न करता ही लस मिळू शकणार नाही. नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आलेय. देशात सध्या कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन प्रकारच्या लस दिल्या जात आहेत. ज्या लसीचा प्रथम डोस दिला जातो, त्याच लसीचा दुसरा डोसही घेणे आवश्यक आहे. आरोग्य मंत्रालयासह केंद्र सरकारनं लस मिळण्यासाठी नोंदणी प्रक्रिया काय असेल, याबाबत माहिती दिलेली आहे.

आपला नंबर लसीसाठी कसा येईल?
1 मेपासून वय वर्षे 18 हून अधिक असलेल्यांना लस मिळणार आहे. त्यासाठीही कोविन वेब पोर्टलमार्फत नोंदणी करावी लागेल. नोंदणीबद्दलची अफवा पसरली होती. ती 24 एप्रिलपासून सुरू होईल, असं सांगण्यात येत होते. पण सरकारनं 24 नव्हे तर 28 एप्रिलपासून नोंदणी सुरू होईल, असे स्पष्ट केले. आपण कोविन पोर्टलवर लॉगिन करून नोंदणी करू शकता. https://selfregifications.cowin.gov.in/.

नोंदणी केल्याशिवाय लस मिळणार का?
कोरोना लस नोंदणी केल्याशिवाय मिळणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केलेय. Mygov ट्विटर अकाऊंटमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण नोंदणी 28 एप्रिलपासून सुरू होईल आणि या लस देण्यास 1 मेपासून सुरुवात होईल. 18-45 वर्षे वयोगटातील लोकांना भेटीशिवाय लसीकरण करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

स्पॉट रजिस्ट्रेशनचे काय होईल?
45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी वॉक इन रजिस्ट्रेशनमध्ये स्पॉट नोंदणीची सुविधा पूर्वीप्रमाणेच सुरू राहील. परंतु जे 18 अधिक आहेत, त्यांच्यासाठी कोव्हिन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक असेल. 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांची श्रेणी मोठी आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी टाळण्यासाठी नोंदणीचा ​​आदेश देण्यात आला आहे.

नोंदणी कशी करावी?
पीआयबीने सरकारच्यावतीने नोंदणी प्रक्रियेची माहिती दिलीय. कोरोना लसीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे. आपणास लसीसाठी कोव्हिन पोर्टलवर (https://selfregmission.cowin.gov.in/) किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपद्वारे नोंदणी करावी लागेल.

येथे संपूर्ण प्रक्रिया
पोर्टलवर नोंदणीचा ​​एक पर्याय https://selfregmission.cowin.gov.in येथे असेल.
येथे आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल आणि गेट ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी मेसेज येईल. तो 180 सेकंदात टाईप करावा लागेल.
नंतर सबमिट केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला आपला तपशील भरावा लागेल.
आधार व्यतिरिक्त फोटो ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड आणि फोटो ओळखण्यासाठी व्होटरआयडी यांचा पर्याय आहे.
या पर्यायांपैकी एक निवडा आणि तुमचा आयडी क्रमांक द्या
नंतर आपल्याला आपले नाव, लिंग आणि जन्मतारीख भरावी लागेल.
यानंतर सर्वात जवळचे कोविड लसीकरण केंद्र निवडण्याचा पर्याय असेल.
केंद्र निवडल्यानंतर आपण आपल्या सोयीनुसार उपलब्ध स्लॉट निवडू शकता.
“तुमचा नंबर आला की जा आणि लस घ्या.

खासगी कंपन्याही आपल्या कर्मचार्‍यांना लसी देऊ शकतात?
कॉर्पोरेट क्षेत्रातून अशी मागणी मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये येत आहे. ब्रिज कँडी हॉस्पिटलचे डॉ. हेमंत ठक्कर यांच्या म्हणण्यानुसार, आधी उत्पादन आणि वितरण यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण होते, पण आता त्यात शिथिलता आली आहे. कंपन्यांनी लस उत्पादनाच्या 50 टक्के केंद्र सरकारला देतील आणि उर्वरित 50 टक्के बाजारात विक्री करू शकतात, असे सरकारने स्पष्ट केलेय. राज्य सरकारदेखील कंपन्यांकडून थेट मागणी करू शकतात. अशा परिस्थितीत नर्सिंग होम किंवा खासगी रुग्णालयांच्या मदतीने खासगी कंपन्या आपल्या कामगारांना समांतर लसीकरण मोहीमदेखील चालवण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जोखीम असलेल्या लोकांना लसी देण्यात येत होती. दुसऱ्या टप्प्यात, ही लस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांना दिली गेली. आणि आता 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यात 18+ लोकांना देखील लसीकरण मोहिमेत समाविष्ट केले गेले आहे.