मुंबई : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक आहे. अटलजींची प्रकृती सुधारावी, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी सर्वत्र प्रार्थना केली जात आहे. मात्र काही वृत्तवाहिन्यांनी आपल्या उतावीळपणाचं प्रदर्शन करत, अटल बिहारी वाजपेयी यांच्या यांच्याविषयी चुकीचं वृत्त चालवलं. अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू आहेत. अटलजींच्या प्रकृतीविषयी वेळोवेळी, मेडिकल बुलेटीन माहिती दिली जात आहे.
सायंकाळी ५ नंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या तब्येतीबद्दलचे बुलेटिन एम्स प्रसिद्ध करणार आहे.
काय झाला हा प्रकार….
वाजेपयींच्या प्रकृतीविषयीचं अपडेट देण्यासाठी देशभरातील मीडिया, डोळा लावून बसला आहे. यात भाजपाचे नेते आणि देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांची एक प्रतिक्रिया एएनआय या न्यूज एजन्सीला दिली. आधीच भांबावलेल्या लोकांनी राजनाथ यांची प्रतिक्रिया अर्धवट ऐकली, अन्यथा नीट ऐकली नाही.
राजनाथसिंह नेमके काय म्हणाले…
राजनाथ सिंह आपल्या प्रतिक्रियेत म्हणत होते. बलराम दास टंडन जनसंघाचे संस्थापक सदस्य होते, भाजपा उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. आणीबाणीत त्यांनी जेल देखील भोगली होती. छत्तीसगडचे राज्यपाल बलराम दास टंडन यांचं, १४ ऑगस्ट रोजी छत्तीगडमधील रायपूरमध्ये हृदय विकाराने निधन झालं. राजनाथ सिंह हे बलराम दास टंडन यांच्याविषयी बोलत होते.
वाजपेयी यांच्याविषयी बोलत असल्याचा समज
पण हा व्हिडीओ अर्धाच दिसला आणि त्यातही राजनाथ यांनी एकदाच टंडन यांचं नाव घेतल्याने, राजनाथ सिंह अटलबिहारी यांच्याविषयी बोलत असल्याचा समज झाल्याने, काही वृत्तवाहिन्यांनी वाजपेयींविषयी चुकीची बातमी चालवली.