RBI repo rate: आरबीआयकडून रेपो दरात कपात, गृहकर्जे स्वस्त होणार

Date:

मुंबई: रिझर्व्ह बँकेनं (RBI) गृहकर्ज घेणाऱ्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आरबीआयच्या पतधोरण आढावा समितीनं आज रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. रेपो दर ६.२५ वरून ६ टक्क्यांवर आले आहेत. त्यामुळं आगामी काळात गृह, वाहन अथवा अन्य कर्जे स्वस्त होणार आहेत. तसंच ज्यांनी गृहकर्ज घेतलंय, त्यांच्या ईएमआयमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

२०१९-२० या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या द्वैमासिक पतधोरण आढावा बैठकीत समितीनं रेपो दरात ०.२५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला. समितीच्या सहापैकी पाच सदस्यांनी कपातीचं समर्थन केलं. तसंच या वर्षात आर्थिक विकास दर ७ टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

अधिक वाचा : नागपुरातल्या ‘या’ बिल्डरवर आयकर विभागाची धाड

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Wockhardt Hospitals Introduces Next-gen Robotic Knee Surgery in Nagpur, Empowering Patients to Walk Pain-free Again

MISSO Robotic System brings global orthopaedic technology closer to...

🎉 Black Friday 2025: The Ultimate Guide to Gadget Deals in India

As the holiday season approaches, Black Friday has evolved...

Nagpur Winter 2025: A Season of Chill, Haze & Quiet Magic

As winter unfolds across Nagpur in 2025, the city...

Merry Christmas Wishes 2025

Merry Christmas Wishes 2025 “Wishing you a very merry Christmas...