नागपूर : राणी लक्ष्मीबाई दुर्गा मंडळातर्फे मागील बारा वर्षापासून भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचे विशेष आकर्षण म्हणून सबमरीन ( पाणबुडी) चा देखावा बॉलीवूड आर्ट दिग्दर्शक यांनी केला असून, त्यामध्ये देवीच्या मूर्ती ची स्थापन करण्यात येत आहे, दर्शनसाठी नागपूर व मध्य भारतातून लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नवरात्रोत्सवनिमित्त्य मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते यामध्ये स्वातंत्र्य, संग्राम, साक्षरता, आत्ममग्नता, पर्यावरण व बालमजुरी अशा विविध विषयावर प्रबोधन पर कार्यक्रमाचा समावेश असतो.
मंडळातर्पे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा हा उत्सव स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित असतो यामध्ये ब्रिटिशांच्या जात्यातून देशाची सुटका करणारा स्वतंत्रा सैनिकाचे जीवन व कार्याचे दर्शन घडवणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात येते यावर्षी मंडळातर्फे झाशी राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली देण्यात येणार आहे.
चित्रप्रदर्शन व दृक श्राव्य माध्यमातून लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास उलगळण्याचा प्रयत्न या प्रदर्शनाद्वारे करण्यात येईल मागील वर्षी भारताचे स्वतंत्र चळवळीला आकार देणार सार्वजनिक गणेशोत्सवाचा आरंभ करणारे लोकमान्य बाल गंगाधर टिळकयांचा जीवन दर्शविण्यात आले होते चित्र प्रदर्शन व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळ यांची विशेष ओळख आहे. नवरात्रोत्सवाद्वारे अशा प्रकारची सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे हे विदर्भातील एकमेव मंडळ मागील वर्षी मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये अनुराधा पौडवाल व अनुप जटोला यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मंडळातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये सोनिया परचुरे चा डान्स बेल्ल्लेट व संजीवनी भेलांडे चे गायन तसेच प्रसिद्ध मराठी नाटक हसवा फसवी, फशन शो, बॉलिवूड हंगामा आयोजित करण्यात आले आहे या व्यतिरिक्त महा करबा नवचंडी यज्ञ व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे अशा प्रकारचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या पश्चिमत्य शैलीकडे वळत असलेले युवकांना भारतीय संस्कृती व तिचा समृद्ध वारसा याविषयी जागरूक करण्याचे कार्य मंडळ करीत आहे या उत्सवाला प्रत्येक दिवशी एका लाखापेक्षा अधिक लोक भेट देतात.