नागपूर मध्यवर्ती कारागृहात दि. २६.०८.२०१८ रोजी माननीय श्री सुरेंद्रनाथ पांडेय, पोलीस महासंचालक व मा. श्री योगेश देसाई, कारागृह उपमहानिरक्षक, पूर्व विभाग नागपूर यांच्या उपस्थितीत विविध अशासकीय संस्थांचा माध्यमातून बंदयांकरीता रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
कारागृहात बंदी बंदिस्त असताना ते आपल्या कुटुंबापासून व समाजापासून अलिप्त असतात, त्यामुळे त्यांच्यात एकांतपणाची भावना निर्माण होऊ नये यासाठी बंदयांकरीता सर्व सण कारागृहात साजरे करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी बंदयांकरीता कारागृहात विविध अशासकीय संस्थांच्या महिलांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो.
दि. २६.०८.२०१८ रोजी रक्षाबंधन सणानिमित्य ऑल इंडिया सोनार संस्था, माया महिला संरक्षण संस्था, जिल्हा स्काऊट आणि गाईड, सिटीझन फोरम फॉर इक्वालिटी इ. शासकीय संस्थांच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कारागृहात बंदयांना राख्या बांधल्या.
तसेच कारागृहाच्या बंदयांच्या बहिणींनी दिलेल्या राख्या प्रशासनाच्या वतीने बंदयांना देण्यात आल्या. तसेच कारागृहाच्या बाहेर महिला बंदयांनी तयार केलेल्या राख्या विविध अशासकीय संस्थांना व नातेवाईकांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.
अधिक वाचा : नंदा जिचकार महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी