नागपूर : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांना लवकरच आनंदवार्ता मिळू शकते. बंगालच्या उपसागरात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत असून, ते विदर्भाच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे येत्या रविवारनंतर विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह दमदार पावसाची दाट शक्यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे.
वरुणराजाने दडी मारल्याने सध्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिक चिंतित आहे. मागील तीन-चार दिवसांपासून उन्हाचे अक्षरश: चटके बसताहेत. काही शहरांमध्ये पाराही 35 अंशांवर गेला आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम संकटात सापडला असून, धान, सोयाबीन, कापूस व अन्य पिकांची स्थिती चिंताजनक आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती आणखी चिघळू शकते. सप्टेंबर अर्धा संपत आल्याने मॉन्सून लवकरच परतीच्या मार्गाने निघणार आहे. त्यामुळे येणारा पाऊस मॉन्सूनचा कदाचित शेवटचा पाऊस असणार आहे.
अधिक वाचा : विदर्भात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपूर येथे होण्याची शक्यता