अंबाझरीतील ऑनलाइन सेक्‍स रॅकेट वर छापा

Date:

नागपूर : इंटरनेटवरून ऑनलाइन एस्कॉर्ट सर्व्हिस देऊन सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेट वर गुन्हे शाखेने छापा घातला. छाप्यात पश्‍चिम बंगालच्या दलालास अटक केली. देहव्यापाराच्या दलदलीत अडकलेली गुजरातच्या २३ वर्षीय तरुणीला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी केली.

शंकर ऊर्फ सुधीर रामपद घोष (५२, रा. बबुलागाव, हसकाली. जि. नंदिया-पश्‍चिम बंगाल) हा उपराजधानीत पश्‍चिम बंगाल व गुजरात राज्यातील तरुणींचा देहव्यापारासाठी वापर करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्‍त संभाजी कदम यांना मिळाली. फुटाळा, अमरावती रोडवर युवतींना उभे करून तो थेट आंबटशौकीनांशी सौदा करीत होता. कदम यांनी सोमवारी सायंकाळी पंटर पाठविला. मोठी रक्‍कम देऊन सुधीर घोष याने सौदा केला.

तरुणीला लॉजवर जाण्यास सांगितले. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सुधीरला अटक केली तसेच युवतीला ताब्यात घेतले. अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोठे नेटवर्क उद्‌ध्वस्त
सुधीर घोष हा मोठा दलाल आहे. त्याच्याकडे गुजरात, जम्मू-काश्‍मीर, कोलकाता, ओडिशा, चेन्नई, आसाम, पंजाब येथील तरुणी देहव्यवसायासाठी संपर्कात आहे. सुधीर देहव्यापारच्या पैशावर विमानाने वारी करतो. अन्य राज्यांतील मुलींना नागपुरात बोलावून त्यांना मोठमोठ्या हॉटेलमध्ये ठेवतो. तरुणींना थेट फुटाळा, सीताबर्डीतील मॉल, अंबाझरी आणि अमरावती रोडवर व्यवसायासाठी पाठवतो. त्यानंतर ऑनलाइनवरून ग्राहकाला कारमध्ये पाठवून लाखो रुपये कमावतो.

अधिक वाचा : नागपुर स्टेशन पर आरपीएफ ने पकड़ी गांजे की खेप : ४ लाख का गांजा बरामद

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related