नागपूर : एम्प्रेस मॉलमधील फिनिक्स मॉल नावाने वेलनेस सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटवर गुन्हेशाखेने छापा घातला. या प्रकरणी एका दलाल युवतीसह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत एक नेपाळची आणि छत्तीसगडमधील दुसरी तरुणी पोलिसांच्या हाती लागली.
गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एम्प्रेस मॉलच्या पहिल्या माळ्यावर ‘फिनिक्स वेलनेस सेंटर’ नावाने आरोपी मनीष लांजेवार आणि ढेरेक मंचेडो यांचे दुकान आहे. येथे महिला आणि पुरुषांची मसाज थेरपी केली जाते. मनीष आणि ढेरेक यांनी गेल्या दीड वर्षांपासून सेक्स रॅकेट सुरू केले. दलाल तन्वी महेंद्र चोटलिया हिच्याकडे तरुणींसाठी आलेल्या ग्राहकांना पैशाचा सौदा करण्याची जबाबदारी देण्यात आली. चौघांनी गेल्या दीड वर्षांपासून मोठे सेक्स रॅकेट उघडून लाखोंची उलाढाल केली होती.
ही माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे यांना मिळाली. त्यांनी एसएसबीचे उमेश बेसरकर, अनुपमा जगताप यांच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. पाठवलेल्या पंटरने मनीष आणि ढेरेक यांची भेट घेत सौदा केला. तन्वी चोटलियाने दोन्ही मुलींना दाखवून पंटरला रूम उपलब्ध करून नेपाळी युवतीला रूममध्ये पाठविले. पंटरने इशारा करताच पोलिसांनी छापा घातला. तन्वीसह तिन्ही युवतींना ताब्यात घेतले.
अधिक वाचा : महिलेची निघृणपणे हत्या करणाऱ्या दरोडेखोराला नागपूर येथे अटक