गंगा जमनातील ‘व्हाइट हाऊस’ मध्ये छापा

Date:

नागपूर : कुप्रसिद्ध गंगा जमनातील न्यू मंगळवारी येथील ‘व्हाइट हाऊस’मध्ये सुरू असलेल्या देह व्यापार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मंगळवारी छापा टाकला. पोलिसांनी दोन महिला दलालांना अटक करुन दोन पीडित तरुणींची सुटका केली. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी ही कारवाई केली.

हे हाऊस अत्यंत पॉश असून, येथे ग्राहकांना संपूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्यात असून मुंबई व दिल्लीतील तरुणींकडून येथे अश्लील नृत्यही करवून घेतल्या जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पथकाने सायंकाळी सापळा रचून हाऊसमध्ये छापा टाकला. एक महिला तरुणीला घेऊन थेट गच्चीवरील पाण्याच्या टाकीमागे लपली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले. दोन पीडितांची सुटका करून दोघींना अटक केली. सुटका करण्यात आलेली एक तरुणी अल्पवयीन असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा : नागपूरच्या फिरंगी हॉटेलमध्ये हुक्का पार्लरवर छापा, ३० जण ताब्यात

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related