पंजाबमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या सख्ख्या भावासोबत लग्न केलं. कारण तिला ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट व्हायचं होतं. लग्नानंतर तिने फेक पासपोर्ट बनवला आणि ऑस्ट्रेलियाला गेली. याची तक्रार एका महिलेने पोलिसात केल्यावर या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणात भाऊ-बहिणीचे घरवाले देखील सामिल होते. पंजाब एका गावातील तरूणीला परदेशातून जाऊन रहायचं होतं, पण तिला व्हिसा मिळण्यास अडचण येत होती.
पोलीस अधिकारी जय सिंह म्हणाले की, ‘तपासानुसार आम्हाला अशी माहिती मिळाली की, तरूणीचा भाऊ ऑस्ट्रेलियात स्थायी नागरिक आहे आणि त्याच्या बहिणीने खोटी कागदपत्रे तयार केली. मॅरेज सर्टिफिकेट गुरूद्वारातून तयार करून घेतलं आणि ऑफिसमधून परवानगी घेतली’.
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ‘त्यांनी सामाजिक व्यवस्था, कायदे व्यवस्था आणि धार्मिक व्यवस्थेसोबत खोटेपणा केला आहे. जेणेकरून देशातून बाहेर जाता यावं. आम्ही रेड टाकत आहोत. पण ते पळत आहेत. सध्या कुणालाच ताब्यात घेण्यात आलेलं नाही’.
खोटी कागदपत्रे तयार करून तरूणी आपल्या भावासोबत ऑस्ट्रेलियाला पळून गेली. तिचा भाऊ ऑस्ट्रेलियात नोकरी करतो. पोलिसांनुसार, हा फसवणुकीचा गंभीर गुन्हा आहे. ज्यात संपूर्ण परिवाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. जय सिंह म्हणाले की, परदेशात जाण्यासाठी लोक अनेक प्रकारे फसवणूक करतात. मात्र, परदेशात जाण्यासाठी सख्ख्या भावासोबत लग्न केल्याची ही पहिलीच घटना ऐकली आहे. ही घटना ऐकल्यावर आम्ही हैराण झालो.