नागपूर : २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधवाडा साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागामध्ये जनजागृती अभियान राबविले जात आहे. या जनजागृती अभियानाद्वारे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण तरुणींना मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाहीच्या बळकटीकरणास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच अभियानाद्वारे सोमवारी (ता. २१) मनपा उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहरातील कमला नेहरू महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाच्या परिसरात सेल्फी स्टँड उभारण्यात आला होता. याशिवाय ‘मी मतदार यादीत नाव नोंदविणार’ अशा शीर्षकाचे सेल्फी स्टिकही ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी सेल्फी स्टँड व सेल्फी स्टिकसह फोटो काढून मतदार यादीत नाव नोंदविण्याचा संकल्प केला.
याप्रसंगी हनुमान नगर झोनचे कर आकारणी विभागाचे सहायक अधीक्षक विकास रायबोले, कमला नेहरू महाविद्यालयाच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी वंजारी, प्राचार्य डॉ. अशोक कांबळे, उपप्राचार्य डॉ. प्रदीप दहीकर, निर्भय बेटी सुरक्षा अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर गुरव, कार्याध्यक्ष संजय कटकमवार, कमलदीप सिंग, बबलू भाई, फिरोज पठाण, महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. माधवी खंडाईत, प्रा. ललीता सोरते, प्रा. अर्चना पालांदुरकर, डॉ. सुचेता पारकर, डॉ. मृणाल वलीवकर, डॉ. ममता वाघ, वर्षा अबोजवार, शोभना शर्मा, अरविंद रंगारी आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : नागपूर महानगरपालिका तर्फे सुराज्य दौडचे आयोजन