पंतप्रधानांची मोठी घोषणा! केंद्र सरकार राज्यांना मोफत लस पुरवणार

मोदींच्या 3 हायलेव्हल मीटिंग आज: ज्या राज्यांमध्ये कोरोना प्रकरण सर्वात जास्त,त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी होणार चर्चा; ऑक्सिजन कंपन्यांच्या मालकासोबतही करणार चर्चा

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करत आहेत. यापूर्वी कोरोना महामारीच्‍या काळात पंतप्रधान मोदी यांनी वेळोवेळी देशाला संबोधित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे…

लशीच्या संदर्भात शंका निर्माण करणारे, अफवा पसरवणारे लोक नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे. अशा अफवांपासून दूर रहा

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सावधगिरी बाळगत रहा, दुर्लक्ष करू नका- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातील नागरिकांना, युवकांना आवाहन करतो की लशीकरणासंदर्भात जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढविण्यात आली आहे

नोव्हेंबरपर्यंत देशातल्या ८० कोटींहून अधिक नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाणार

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना दिवाळीपर्यंत वाढविण्यात आली आहे

देशातल्या cowin प्लॅटफॉर्मची जगभरात चर्चा, अनेक देशांनी हेच व्यासपीठ वापरण्याची दाखवली तयारी- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

केंद्र सरकार लस मिळवण्याची आणि लसीकरणाची गती वाढवणार

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या लशी मोफत दिल्या जातील. खासगी रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या लशींसाठी मात्र शुल्क द्यावे लागेल

केंद्र सरकार लस मिळवण्याची आणि लसीकरणाची गती वाढवणार

खासगी रुग्णालये लशीच्या निश्चित किंमतीच्या वर केवळ 150 रुपये सेवा शुल्क आकारू शकतील

लस निर्मात्यांकडून केंद्र सरकार 75 टक्के लस खरेदी करणार आणि राज्यांना पुरवणार

आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून पासून 18 वर्षावरच्या सर्व नागरिकांसाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस पुरवणार

मोठ्या प्रमाणावर झालेल्या विचारांती राज्यांच्या मागण्यानुसार लशीकरण कार्यक्रमाचे विकेंद्रीकरण करण्यात आले, 25 टक्के लशींची खरेदी करण्याचे अधिकार देण्यात आले – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

सर्वांना मोफत लस देण्याचा कार्यक्रम जानेवारीपासून एप्रिलपर्यंत जोमात सुरू होता

स्थानिक संचारबंदी, पायाभूत सुविधा निर्मिती यासारख्या गोष्टींवर सरकारने राज्यांच्या मागण्या मान्य केल्या

संविधानात आरोग्य हा राज्यांच्या सूचीत आहे. त्यामुळे लशींच्या खरेदीसाठी राज्यांना दिशानिर्देश देण्यात आले

नाकाद्वारे द्यायच्या लशीची चाचणीही देशात सुरू आहे.

लहान मुलांसाठीच्या दोन लशींची चाचणी देशात वेगाने सुरू आहे

गेल्या काही काळापासून देशात जे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे लवकरच लशींचा पुरवठा वाढेल. देशातल्या ७ कंपन्या लशींचे उत्पादन करत आहेत. ३ लशींच्या चाचण्या सुरू आहेत.

देशात गेल्यावर्षीच लशींच्या कृती दलाची निर्मिती करण्यात आली होती. लस निर्मात्यांना सर्व प्रकारची मदत देण्यात आली

देशाने प्रत्येक शंकेला दूर करत कोरोनावरील केवळ एकच नाही तर दोन लशी सादर केल्या आहेत.

कोरोना लशीच्या मागणीच्या तुलनेत उत्पादन आणि पुरवठा कमी

कोरोनाविरोधात लढ्यात लस हे सुरक्षा कवच

कोरोना काळात आवश्यक औषधांचे उत्पादन वाढविण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले.

गेल्या शंभर वर्षातील ही सर्वात मोठी महामारी आहे.

आधुनिक जगाने असा साथीचा रोग कधी पाहिलेला किंवा अनुभवला नव्हता.

आपल्या देशाने अशा अनेक जागतिक महामारीसह अनेक आघाड्यांवर एकत्र लढा दिला आहे

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान एप्रिल आणि मे महिन्यात भारतातील वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी वाढली.

भारताच्या इतिहासात कधीही इतक्या प्रमाणात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज भासली नव्हती.

ही गरज भागविण्यासाठी युद्धपातळीवर काम केले गेले. सरकारच्या सर्व यंत्रणेने युद्ध पातळीवर काम केले.