रिपब्लिकन नगरामध्ये मध्ये ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण

Date:

नागपूर : उत्तर नागपूरातील रिपब्लिकन नगरामध्ये मिसाळ ले आऊट परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवाप्रसंगी राष्ट्रीय विधी विद्यापीठ,नागपूरच्या वसतिगृह अधीक्षिका श्रीमती नेहा ठोंबरे यांनी ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे आयोजन लिबर्टी क्लासेस या स्पर्धा परिक्षाचे मार्गदर्शन करणा-या संस्थेद्वारे करण्यात आले होते.

स्त्री-शिक्षणाच्या अग्रदूत असणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याचे दर्शन या प्रयोगाच्या माध्यमातून उपस्थितांना घडले. उत्तर नागपूरातील या मागास भागात सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भात सादर होणारा हा पहीलाच नाट्यप्रयोग होता.आतापर्यंत नागपूर व इतर जिल्ह्यात विविध समाजसेवी संघटनेच्या वतीने आयोजित अनेक कार्यक्रमांमध्ये या प्रयोगाचे सादरीकरण झाले असून फुले दाम्पत्यांनी रुजवलेल्या शिक्षण व समाजपयोगी विचाराचा प्रसार नेहा ठोंबरे या नाट्यकृतीद्वारे स्वयंस्फुर्तीने करत आहेत.

रिपब्लिकन नगर येथे ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ‘ एकपात्री प्रयोगाचे सादरीकरणाप्रसंगी परिसरातील नागरिक व लिबर्टी क्लासेस नागपूरचे पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : पाणीटंचाईचे संकट खोल; १९ गावांना टँकरने पुरवठा

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Sitabuldi Fort to Open for Public on Republic Day 2026 – A Rare Heritage Experience in Nagpur

Nagpur is gearing up for a memorable Republic Day...

The Story of Nagpur : From Ancient Roots to Modern Orange City

Nagpur : fondly known as the Orange City of...

India vs New Zealand T20i in Orange City Nagpur Jamtha on January 21, 2026

Cricket fever is ready to grip Nagpur once again...