प्रस्थानम चे मोशन पोस्टर रिलीज, गावकऱ्याच्या लुकमध्ये ‘संजू’बाबा !

Date:

सात वर्षांनंतर पुन्हा एकदा संजय दत्त प्रसिद्ध तेलुगू चित्रपट प्रस्थानम च्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकांऊटवर हे पोस्टर शेअर केले आहे.

पोस्टरमध्ये संजयने पांढऱ्या रंगाचा धोती-कुर्ता घातला आहे. तसेच एका शेतामध्ये तो चालत असल्याचे दिसत आहे. या अंदाजात संजय अतिशय हटके लुकमध्ये दिसून येत आहे.

संजयने पोस्टर शेअर करत लिहिले, ‘हक दोगे तो रामायण शुरु होगी, छिनोगे तो महाभारत !’. ‘प्रस्थानम’ हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असणार आहे. संजय दत्तची यात मुख्य भूमिका आहे.

देवा कट्टा दिग्दर्शित चित्रपटात जॅकी श्रॉफ, अमायरा दस्तूर, चंकी पांडे, अली फजल आदींची महत्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या काही भागांची शूटिंग लखनौमध्ये करण्यात आली आहे.

अधिक वाचा : Poster Of Sunny Deol’s Bhaiaji Superhit Released

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related