बाहुबली प्रभासचा येतोय नवीन चित्रपट

Date:

मुंबई :

बाहुबली‘ स्टार प्रभासचे चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच दरम्यान प्रभासच्या आगामी ‘राधे- श्याम’ चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडेचा रोमांन्स पाहायला मिळणार आहे.

प्रभास आणि पूजा हेगडेने सोशल मीडियावर ‘राधे- श्याम’ या चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी लिहिले आहे की, ‘माझ्या चाहत्यांनो, हे तुमच्यासाठी आहे. आशा आहे की, आपल्याला हे आवडेल. #Prabhas20FirstLook #RadheShyam.

या चित्रपटात भाग्यश्री, मुरली शर्मा, सचिन खेडेकर, प्रियदर्शी, साशा छेत्री, कुणाल रॉय कपूर आणि सत्यन यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत.’राधे- श्याम’ चित्रपटाचे हिंदी वर्जन टी- सीरीज घेऊन येत आहे. या चित्रपटाचा पहिला लूक रिलीज झाल्यानंतर ट्विटरवर तो नंबर वन ट्रेंड बनला आहे.’राधे- श्याम’ हा चित्रपट २०२१ मध्ये रिलीज होणार आहे. याआधी प्रभास आणि श्रद्धा कपूरचा ‘साहो’ हा चित्रपट येवून गेला होता. या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धाची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Cloud Migration With Amazon Web Services: AWS Migration Services

Cloud migration refers to the process of relocating digital...

AWS Server Migration Service – Uses and Benefits

What is AWS Server Migration Service (SMS)? AWS server migration...

Holi 2025 in Nagpur: Find the Best Venues to Celebrate with Colors, Music, and Fun!

Holi 2025 in Nagpur is a celebration of a...

Maharashtra Farmers Demand Biotech Breakthroughs to Boost Cotton, Compete Globally

Nagpur : As the debate over biotechnology in Indian...