भरधाव ट्रक ची मोटरसायकलला धडक, पोलीस कर्मचाऱ्याचा म्रुत्यु

Date:

नागपूर : भरधाव ट्रक ची मोटरसायकलला धडक बसून झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा म्रुत्यु झाला आहे. ही दुर्घटना गुरुवारी सायंकाळी मार्टिननगर पुलावर घडली असून , यामुळे पोलीस कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अजितसिंग सुरेंद्रसिंग ठाकूर वय २८ वर्ष रा. मानकापूर असे अपघातात म्रुत्यु झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

अजितसिंग नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होते व त्यांची ड्युटी ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे होती. ते ड्युटी आटोपून गुरुवारी सायंकाळी मोटरसायकलने घरी परत जात होते. वाटेत मार्टिननगर पुलावर 16 चाकी भरधाव ट्रकने मोटरसायकलला धडक दिली, यात गंभीर जखमी होऊन त्यांंचा म्रुत्यु झाला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी ट्रकचालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : नागपुरात गुंडागर्दी, २० ‘आपली बस’च्या काचा फोडल्या

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related