मुंबई : पोको (Poco) या स्मार्टफोन उत्पादक कंपनीने मंगळवारी आपला पहिला 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Poco M3 Pro 5G असे आहे. हा स्मार्टफोन मे महिन्यात जागतिक बाजारात लाँच झाला होता आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच होईल अशी अपेक्षा होती. तथापि, COVID-19 च्या परिस्थितीमुळे स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने मे महिन्यातील त्यांचे सर्व लॉन्च इव्हेंट रद्द केले. भारतातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत आहे. त्यामुळे कंपनी त्यांचा बहुप्रतीक्षित Poco M3 Pro 5G हा स्मार्टफोन आज लाँच करण्यात आला आहे. (Poco M3 Pro 5G Launched in India with Dimensity 700 SoC and 5000mAh battery)
हा स्मार्टफोन रेडमी नोट 10 एस, रेडमी 8 आणि पोकोचा स्वतःचा फोन पोको एक्स 3 सारख्या मिड रेंज डिव्हाइसेसना टक्कर देईल. आपण फोनच्या काही खास वैशिष्ट्यांविषयी चर्चा केली तर आपल्याला त्यात 90Hz एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी 700 SoC आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल.
This is it, folks. Welcome to the era of the #POCOM3Pro 5G. The sale kicks off on @Flipkart on June 14th at 12 noon. Make sure you get your #MadSpeedKillerLooks pic.twitter.com/DbKAEgvTbZ
— POCO India – Register for Vaccine 💪🏿 (@IndiaPOCO) June 8, 2021
फोनची भारतातील किंमत
Poco M3 Pro 5G हा फोन भारतात 13,999 रुपये या किंमतीत लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी तुम्हाला 15,999 रुपये मोजावे लागतील. या दोन्ही व्हेरिएंटची विक्री 14 जूनपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. या फोनच्या पहिल्या सेलमध्ये युजर्सना 500 रुपयांची सूट मिळू शकते. हा स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे ज्यात ब्लू, पॉवर ब्लॅक आणि पोको यलो या रंगांचा समावेश आहे.
Poco M3 Pro 5G चे फीचर्स
Poco M3 Pro 5G मध्ये 6.5 इंचांचा FHD+LCD डॉट डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 1100 निट्स ब्राइटनेट आणि 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. यामध्ये डायनॅमिक स्विच फीचरही देण्यात आले आहे. स्मार्टफोनमध्ये 700 SoC Mali- G57 MC2 GPU प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्स या फोनची स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे वाढवू शकतात. Poco M3 Pro 5G MIUI 12 आधारित अँड्रॉयड 11 वर काम करेल. हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे, जो मीडियाटेक चिपसेटसह येतो.
कॅमेरा
स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 5000mAh क्षमतेची आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देखील स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे.