नागपूरमध्ये प्लास्टिक गोदामाला भीषण आग

Date:

नागपूर, 16 जून : नागपूरमध्ये इतवारी चाळीत एका गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आज पहाटे नागपूर शहरातील इतवारी येथील चुना ओळी परिसरात असलेल्या एका प्लास्टिकच्या गोदामाला आग लागली आहे. काही वेळात आगीने रौद्ररुपधारण केले आहे. इतवारी परिसरात दूरवर आगीमुळे धुराचे दूरपर्यंत लोट पसरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीची वातावरण पसरले आहे.

आगीची माहिती मिळताच पालिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आतापर्यंत अग्निशामन दलाच्या आठ ते दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जिवीतहानी न झाल्याचे वृत्त आहे. खबरदारी म्हणून गोदामाच्या आजूबाजूचा परिसर हा खाली करण्यात आला आहे.

ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आली नाही. अग्निशमन दलाचे जवानांकडून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Also Read- नागपुरात ३८ पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, रुग्णसंख्या १०४३, मृत्यूसंख्या १७

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Max Super Speciality Hospital, Nagpur, Launches Centre of Excellence for Advanced Robotic Joint Replacement

Nagpur :  Max Super Speciality Hospital, Nagpur, has announced...

MMTC-PAMP Launches Its First Exclusive Store in Nagpur, Brings Its 24k, 999.9+ Purest Gold and Silver Portfolio

Nagpur’s inclusion marks a strategic step in MMTC-PAMP's...

Holi Rang Utsav Nagpur 2026 – The Ultimate Festival of Colours

Holi in Nagpur this year is not just a...