पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तक मिल्खा सिंग म्हणून फरहानचा फोटो

Date:

कोलकाता: पश्चिम बंगालमधील शालेय पाठ्यपुस्तक सध्या चर्चेत आले आहे. पाठ्यपुस्तकात ‘फ्लाईंग शिख’ धावपटू मिल्खा सिंग म्हणून चक्क अभिनेता फरहान अख्तरचा फोटो छापला आहे. हा सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पश्चिम बंगालमधील पाठ्यपुस्तकात फरहान अख्तरचा फोटो छापला असल्याची चूक एका नेटिझन्सने ट्विट करत लक्षात आणून दिली. त्यानंतर अभिनेता फरहान अख्तरने ही गंभीर चूक असल्याचे म्हटले. पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग यांचा चुकीचा फोटो छापण्यात आला असून हे पुस्तक मागे घेण्याची विनंती फरहानने पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांना केले आहे. या ट्विटद्वारे फरहानने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे नेते खासदार डेरेक ओब्रायन यांचेही लक्ष वेधले आहे.

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी सांगितले की, फरहान अख्तर यांनी केलेल्या ट्विटबद्दल माहिती मिळाली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आवश्यक पावले उचलण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

मिल्खा सिंग यांनी भारतीय क्रीडा क्षेत्रात आदराचे स्थान आहे. धावपटू म्हणून काही विक्रमांची नोंद त्यांच्या नावावर आहे. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारे ते भारताचे पहिले धावपटू ठरले. मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहान अख्तरने त्यांची भूमिका साकारली होती.

हेही वाचा : केरल बाढ़ : केरल के लिए पीएम मोदी ने 500 करोड़ रुपये की आर्थिक मदद की घोषणा की

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related