साईंच्या शिर्डीमध्ये एक-एक करून गायब होतायत लोक, उच्च न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

Shirdi

औरंगाबाद, 14 डिसेंबर : शिर्डीला (Shirdi) फिरण्यासाठी आणि साईंच्या दर्शनासाठी येणारे पर्यटक गायब होण्याच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. आतापर्यंत एका वर्षात 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. या प्रकरणात, मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court)आता दखल घेतली आहे आणि बेपत्ता होण्यामागील मानवी तस्करी किंवा अवयव रॅकेटची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद (Aurangabad) खंडपीठाचे न्यायाधीश टीवी नवाडे आणि एसएम गव्हाणे यांच्या खंडपीठाने मनोज कुमार नावाच्या व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना ही प्रतिक्रिया दिली. मनोज यांची पत्नी 2017मध्ये शिर्डी (Shirdi) येथून बेपत्ता झाली होती. यानंतर मनोजने आपल्या पत्नीला शोधण्याचा खूप प्रयत्न केले, परंतु त्या अद्यापही सापडल्या नाहीत.

औरंगाबाद कोर्टाने सांगितले की, गेल्या एका वर्षात शिर्डी (Shirdi) येथून 88 हून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. यापैकी बहुतेक लोक असे आहेत जे मंदिरात दर्शन घेण्यासाठी शिर्डीला पोहोचले. खंडपीठाने म्हटले आहे की, बेपत्ता झालेल्यांपैकी काही लोक सापडले आहेत, परंतु काहींचा अद्याप शोध लागला नाही. अद्याप बेपत्ता झालेल्यांपैकी बहुतेक महिला आहेत. कोर्टाने म्हटले आहे की, जेव्हा एखादा माणूस हरवला तर त्याचे नातेवाईक असहाय्य होतात. बहुतेक लोक पोलिसांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि अशा प्रकरणे कोर्टापर्यंत पोहोचत नाहीत.

कोर्टाने सांगितले की, पोलिसांच्या नोंदीनुसार आतापर्यंत 88 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मानवी तस्करी आणि अवयवांचे रॅकेट असू शकते असे कोर्टाने म्हटले आहे. संभाव्य शक्यता लक्षात घेता कोर्टाने अमहादनगरच्या पोलीस अधीक्षकांना तपासासाठी विशेष युनिट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे शिर्डी (Shirdi) हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आहे. शिर्डीला साईंची नगरी म्हटलं जातं. रोज लाखो भाविक साई बाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये येतात. त्यामुळे अशा घटना वेळीच थांबंवणं महत्त्वाचं आहे.