नागपूर : नागपूर ते भुसावळ दरम्यान रेल्वे कोळसा प्रेषण आणि अतिरिक्त माल वहन मार्गाच्या कामासाठी मध्ये रेल्वे नागपूर मंडळातून जाणाऱ्या आठ पॅसेंजर गाड्या दीड महिना बंद राहणार आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
नागपूर-भुसावळ दरम्यान रोज अनेक रेल्वे पॅसेंजर गाड्या ये-जा करतात. यात हजारो प्रवासी अप-डाउन करतात. प्रवाशासांठी या गाड्या अधिक सोईच्या आहेत. नागपूर- भुसावळ दरम्यानच्या मार्गावर प्रशासनाकडून काम करण्यात येत आहे.
यामुळे हा मार्गच बंद ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परिणामी या मार्गावरून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग कमी करण्यात आहे. जवळपास दीड महिना काम चालणार आहे. या काळात या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
५१२६० / ५१२५९ नागपूर- वर्धा १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च
५१२८६ / ५१२८५ नागपूर – भुसावळ १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च
६८७५५ / ६८७५६ रामटेक – नागपूर मेमू गाडी १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च
५१८२९ नागपूर – इटारसी १७ फेब्रुवारी ते १ एप्रिल
५१८३० इटारसी – नागपूर १६ फेब्रुवारी ते ३१ मार्च
५७१३६ काजीपेट – अजनी १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च
५७१३५ अजनी – काजीपेट १६ फेब्रुवारी ते १ एप्रिल
या गाड्या शॉर्ट टर्मिनेटेड
१२१५९ अमरावती ते जबलपूर ट्रेन १६ फेब्रुवारी ते १ एप्रिलपर्यंत अमरावती ते नागपूरपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
१२१६० जबलपूर – अमरावती ट्रेन १५ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत नागपूर ते अमरावतीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.