नागपूर : दि. २६, २७, २८ ऑक्टोम्बर २०१८ ला सकाळी ११ वाजेपासून तर रात्री ९ वाजेपर्यंत श्री राधेमंगलम वातानुकुलीत सभागृह दिनदयाल नगर रिंग रोड नागपूर या ठिकाणी आयोजित केलेले आहे. प्रदर्शनीचे उदघाटन महापौर (NMC) आदरणीय श्रीमती नंदाताई जिचकार यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक २६ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजता होणार आहे.
आजचे युग तंत्रदयनाचे आहे. देश प्रगतीपथावर आहे सर्वानाच सरकारी नोकरीत स्थिर होणे. शक्य नाही मनात मोठे ध्येय ठेऊन मुली,स्त्रिया शिकताहेत ज्ञान संपादन करीत आहे स्वाभाविकच त्यांच्या आकांशा आणि राहणीमानाचा स्थर देखील उंचावतो आहे. सुंदर दिसावं, स्मार्ट असावं हि आजच्या काळाची गरज आहे तसे पहिले तर प्राचीन काळापासून हे आकर्षण आणि स्त्री सुलभ भावना आम्ही जाणून आहोत. आजची स्त्री सक्षम व्हावी तिच्यातील कला गुणांना वाव मिळावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहेच परंतु निर्णय क्षमता, आर्थिक स्वतंत्र, व्यवहार ज्ञान तसेच बाहेरच्या जगाची ओळख होऊन ज्ञानाच्या कक्षा वृंदावने इत्यादी संपूर्ण जमेच्या बाजू लक्षात ठेऊन हा स्थुल्य उपक्रम राबवण्यात मुख्य उद्देश डॉ. शुभांगी सुभाष कुकेकर यांचा असून ह्या प्रदर्शनी मध्ये मुख्यत्व करून हँडीक्रॉप्ट (हस्त्यकला), ज्वेलरी (आभूषणे), होम डेकोर (गृह सजावट), फॅशन गारमेंटस, ऑसेंसरीज तसेच लागणाऱ्या सर्वच अत्यावश्यक वस्तू दर्जेदार व माफत दरात एकाच छताखाली मिळण्याची व्यवस्था केली आहे प्रदर्शनीच्या प्रथम दिवशी म्हणजेच शुक्रवारी दि. २६ ऑक्टोम्बर २०१८ रोजी सायंकाळी ७.३० वाजता बाजारपेठेत येणाऱ्या नव-नवीन फॅशन गारमेंट्स वर आधारित फॅशन शो आयोजित केला आहे.
अधिक वाचा : एचसीएल आणि स्वप्नभूमी यांच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या विज्ञान केंद्राचे उद्घाटन