नागपूर : लहान मुलांसह आबाल-वृद्धांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण असलेले महाराजबागची मान्यता रद्द करण्याचा निर्णय झाल्याने संपूर्ण नागपूरकरांना मानसिक धक्का बसला आहे. सर्वांनी महाराजबाग बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला.
मुंबईतील राणीची बाग असो किंवा नागपुरातील महाराजबाग हे नेहमीच सर्व स्तरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्र राहिला आहे. केंद्रीय चिडियाघर प्राधिकरणाने महाराज बागची मान्यता रद्द करीत असल्याचा आदेश पारित केल्यानंतर महाराज बाग वाचवण्याकरिता धडपड सुरू झाली आहे. एकशे पंचवीस वर्ष जुनी असलेल्या महाराज बागे मध्ये वाघ, बिबट्या, हरीण, मोर यासह असंख्य पक्षांची आणि वन्यप्राण्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या महाराजबागकडे सर्वच दया नजरेने बघू लागले आहेत.
१९८४ साली स्थापन झालेल्या महाराजबागने अनेक पिढ्या बघितलेल्या आहेत. यापैकी राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह शेकडो मान्यवरांचा समावेश आहे. महाराज बाग म्हणजे प्राणी संग्रहालय नसून अनेकांसाठी ते विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. यामुळेच महाराज बाग वाचवण्याकरिता प्रयत्न सुरू केले जातील मात्र त्याआधी सर्वसामान्य नागरिकांनी चिडियाघर प्राधिकरणाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.
अधिक वाचा : ‘महाराजबाग’ च्या जागेवर सरकारचा डोळा?; मान्यता रद्द करण्याच्या निर्णयावर शंका