ऑपरेशन समुद्र सेतू – आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना घेऊन मालदीववरून तुतीकोरीनला पोहोचले

Date:

नवी दिल्ली, 7 जून 2020 : भारतीय नौदलाद्वारे “ऑपरेशन समुद्र सेतू” साठी तैनात आयएनएस जलाश्व 700 भारतीय नागरिकांना माले, मालदीववरून घेऊन 7 जून 2020 रोजी तुतीकोरीन येथे पोहोचले. वंदे भारत मोहिमेअंतर्गत आयएनएस जलाश्वने मालदीव आणि श्रीलंकेहून आतापर्यंत 2672 भारतीय नागरिकांना भारतात परत आणले आहे.

मालदीवमधील भारतीय दूतावासाच्या मदतीने भारतीय नागरिकांचे नौकारोहण शक्य झाले. आवश्यक वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना जहाजात बसविण्यात आले. सागरी प्रवासादरम्यान कोविड सुरक्षा शिष्टाचारांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

मायदेशी आलेल्या नागरिकांना तुतीकोरीन येधील स्थानिक अधिकाऱ्यांनी सहाय्य केले आणि जलद गतीने जहाजातून खाली उतरवणे, आरोग्य तपासणी आणि प्रवाशांचे इमिग्रेशन आणि वाहतुकीची व्यवस्था केली.

यासह, भारतीय नौदलाने सध्याच्या साथीच्या काळात मालदीव आणि श्रीलंका येथून भारतात आणलेल्या भारतीय नागरिकांची संख्या 2874 वर पोहोचली.

Also Read- DIAT Pune develops Nanotechnology-based Disinfectant Spray to fight COVID-19

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related