नागपूर : प्रियंकाज पेटलहार्ट फाऊंडेशन आणि प्रियंका टिप्स अँण्ड टोज अकॅडमी तर्फे तयार करण्यात आलेल्या लघु चित्रपटाच्या कॉपीचे प्रकाशन नुकतेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व हेमा महिनी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मोहब्बत सिंह तुली, डॉ. प्रियंका सिंह उपस्थित होते.
“शोले हसी के” या चित्रपटामध्ये देशाच्या विकासाचे तेरा मुद्दे दाखविण्यात आले आहे, हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित झाला असून त्याला देशाच्या प्रत्येक नागरिकाने बघावे अशी माहिती चित्रपटाचे निर्माती डॉ. प्रियंका सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. या लघु चित्रपटात नागपूर, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड व कलकत्ता येथील १८० कलाकारानी भाग घेतला असून यात लहान मुलां पासून तर वृध्दापंर्यत मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे.
डॉ. प्रियंका सिंह यांना माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, प्रणव मुखर्जी, व दलाई लामा यांच्याकडून अवार्ड्स मिळालेले आहेत.
डॉ. प्रियंका सिंह यांच्या मते या लघुपटा द्वारे त्यांनी ” Growing India” आणि देशाच्या तरुण पिढी ला योग्य मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला आहे. हा लघुपट ऑनलाइन उपलब्ध असून त्याला www.youtube.com वर बघू शकतो.