नागपूर : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागपूर रेल्वे स्थानकावरील अनेक मार्गांवर प्रवेश बंदी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. स्थानकाच्या आत प्रवेश करण्यासाठी अनेक मार्ग असल्याने गैरप्रकारांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ‘वन एंट्री वन एक्झिट सिस्टम’ सुरू केली आहे.
नागपूर रेल्वेस्थानक हे मध्यभारतातील सर्वात महत्वाचे रेल्वेस्थानक आहे. देशाच्या मध्यस्थानी असल्यामुळे शेकडो गाड्या नागपूर मार्गेच देशाच्या कानाकोपऱ्यात प्रवास करतात. गेल्या काही वर्षांमध्ये नागपूर रेल्वे स्थानकात गैरप्रकारांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्चचिन्ह निर्माण होत आहे. एवढेच नाही तर रेल्वेतून दारू, गांजासह अमली प्रदार्थांची तस्करी देखील वाढल्या आहेत.
वाढत्या गुन्हेगारी घटना थांबवण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या आत आणि बाहेर जाणाऱ्या अन्य मार्गांना बंद करून केवळ वन एंट्री वन एक्झिट सिस्टम लागू करण्यासाठी मध्य रेल्वेचे मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा हे प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मंडळ रेल्वे प्रबंधक महेंद्र उप्पल यांनी आरक्षण काउंटरच्या शेजारी असलेले एमसीओ गेट बंद केले आहे. शेकडो प्रवासी मुख्य मार्गाने न जाता एमसीओ गेट मधूनच रेल्वे स्थानकात प्रवेश करत असत. त्यामुळे या मार्गे येणाऱया सामानाची तपासणी होत नव्हती. मात्र, आता एमसीओ गेटवर कुलूप लावण्याने गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
अधिक वाचा : नागपूर विमानतळावर ‘अॅन्टी हायजॅक मॉक एक्सरसाईज’ प्रात्यक्षिक