प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार दुचाकीवरुन २ तरुण बुट्टीबोरी वरुन नागपूरच्या दिशेने येत होते. यावेळी पुढे जाणाऱ्या बसला ओव्हर टेक करीत असताना त्यांचे अचानक संतुलन बिघडले आणि दोन्ही तरुण दुचाकीवरुन खाली पडले. मागून येणाऱ्या सविरा ट्रॅव्हल्स (एम.एच. ४० वाय. २११५) च्या खाली आल्याने एकाचा मृत्यू झाला तर दुचाकी चालविणारा तरुण जखमी असल्याची माहिती आहे.
महामार्गावर अपघात झाल्याने वाहनांच्या रांगाच लागल्या आणि काही वेळेसाठी दोन्ही बाजूची वाहतूक कोलमडली होती. घटनेची माहिती मिळताच बुट्टीबोरी पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले असून सविरा ट्रॅव्हल्स पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तसेच अपघाताप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.



