नागपूर : जैन मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीला पार्किंगच्या वादातून जबर मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. इतवारी परिसरात गुरुवारी ही घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जैन बाधंवानी लकडगंज पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
मनीष जैन हे सहकुटुंब जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळेस कार पार्किंगच्या मुद्यावरुन त्यांचा विक्की नावाच्या व्यक्तीशी वाद झाला. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विक्कीच्या साथीदारांनी मनीषला जबर मारहाण करायला सुरुवात केली. हाणामारीत मनीषच्या नाकाचे हाड मोडले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती जैन बांधवांना मिळताच त्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठापने बंद करून थेट लकडगंज पोलीस स्टेशन गाठले.
संतप्त झालेल्या जैन बाधंवाची गर्दी पोलीस ठाणे परिसरात वाढू लागल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जैन बांधवांनी पोलीस ठाणे सोडले. ही सर्व घटना पोलिसांनी अतिशय संयमाने हाताळल्याने जैन समाजातील नागरिकांचा रोष कमी झाला.
अधिक वाचा : बारमध्ये वाद, युवकावर चाकूहल्ला