नागपूर: सावकारी प्रकरणात एकाला अटक

Date:

नागपूर : नागपुर जिल्ह्यात भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात अवैद्य सावकारी प्रकरणात महिलेला मारहाण करून शेती बळजबरीने बळकावण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भिवापूर पोलिस स्टेशनला विनयभंग, फसवणूक व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

भिवापुर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात पीडित महिलेच्या पतीची जमीन आहे. आरोपी अभय पाटीलकडून पीडित महिलेच्या पतीने दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते.

याच प्रकारातून २० जूनला पीडित महिला ही शेतात काम करीत असताना आरोपी अभय पाटील व त्याची पत्नी प्राजक्ता पाटील हे गेले. त्यांनी पीडित महिलेला मारहाण करून शेता बाहेर काढले. हा प्रकार समोर येताच भिवापूर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४, ३५४(४), ३५४ (ब), ४२०, ३२३, ५०४, ५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९, ४१ (क), ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

Also Read- एमडी आणि एमएसच्या परीक्षा पुढे ढकला, मुख्यमंत्री ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...