मुंबई : विदर्भ व मराठवाड्यातील कर्मचाऱ्यांसाठी नागपूर महालेखकार कार्यालयाद्वारे धम्म चक्र प्रवर्तन दिवसाच्या निमित्ताने दीक्षाभूमी नागपूर येथे दि. 17 ऑक्टोबर ते 18 ऑक्टोबर पर्यंत मार्गदर्शन केंद्राचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्राच्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या सामान्य भविष्य निर्वाह निधी, पेंशन व राज्य शासनाच्या कार्यालयांच्या लेखांच्या संबंधी मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन केंद्र आयोजित करण्यात आले आहे. या मार्गदर्शन केंद्रामध्ये भविष्य निर्वाह निधी अभिदाता व पेन्शनर मासिक अभिवादन/अग्रिम अदायगीची माहिती एसएमएस सेवेद्वारे प्राप्त करुन घेण्यासाठी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येणार आहे.
विदर्भ आणि मराठवाडा क्षेत्राच्या महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा तसेच सामान्य भविष्य निर्वाह निधी, पेन्शन व राज्य शासनाच्या लेख्या संबंधी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी या कार्यालयाचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा : नागपुरात आता महिलांचे ‘बँड पथक’