ओकिनावा ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक मोटरसायकल ‘ओकी१००’ लवकरच सादर करणार

ओकिनावा या 'मेक इन इंडिया'वर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे.

ओकी१००

मुंबई, २२ मे २०२०: ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाइक ‘ओकी१००’ ही १०० टक्के स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेले उत्पादन असणार आहे. ब्रॅण्ड भारतीय इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाला चालना देत आला आहे. याच दृष्टिकोनासह ओकिनावाने सांगितले आहे की, बॅटरी सेल्स वगळता आगामी ओकि१००चे सर्व घटक भारतामध्ये उत्पादित करण्यात येणार आहेत.

बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक बाइक ‘ओकि१००’ प्रतितास १०० किमीची अव्वल गती प्राप्त करेल आणि या बाइकमध्ये लिथियम आयन बॅटरी असणार आहे. ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये बाइकच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले होते आणि बाइकमधील सर्वोत्तम तंत्रज्ञान वैशिष्ट्ये व आकर्षकतेसाठी उपस्थितांनी बाइकचे भरभरून कौतुक केले होते. ही इलेक्ट्रिक बाइक आर्थिक वर्ष २०२०-२१च्या तिस-या तिमाहीमध्ये सादर करण्‍यात येणार आहे.

ओकिनावाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. जीतेंदर शर्मा म्हणाले. ‘आम्ही पंतप्रधान मोदी यांचा ‘व्होकल फॉर लोकल’ दृष्टिकोनाचे स्वागत करतो. या दृष्टिकोनाला चालना देण्यासाठी ओकिनावाने १०० टक्‍के ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक बाइकची घोषणा केली आहे. सध्या ओकिनावा अधिक प्रमाणात स्थानिक पातळीवर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करत आहे, ज्याचे प्रमाण ८८ टक्के आहे. आमच्या आगामी इलेक्ट्रिक बाइकसह आम्ही स्थानिक पातळीवरील उत्पादनाला १०० टक्क्यांपर्यंत घेऊन जात आहोत. इलेक्ट्रिक मोटरसायकलचे सर्व घटक स्‍थानिक पुरवठादारांकडून उत्पादित व प्राप्त करण्यात येतील. आम्हाला यामुळे स्थानिक पुरवठादार क्षेत्राला चालना मिळण्याची आशा आहे. तसेच यामधून सर्व इव्ही स्टार्टअप्सना ‘ व्होकल फॉर लोकल’चा अवलंब करण्यासाठी प्रेरणा मिळेल’.

Also Read- Amazon India is creating close to 50,000 seasonal opportunities across its fulfilment and delivery network to meet customer needs