धम्मचक्र प्रवर्तन दिन- २०१९ निमित्त दिक्षाभूमी नागपूर येथे दर्शनासाठी येणा-या जनतेसाठी नागपूर महानगरपालिकेने दि. ०८.१०.२०१९ ते ०९.१०.२०१९ या कालावधीत नागपूर रेल्वे स्टेशन ते दिक्षाभूमी येथे “आपली शहर बस सेवा” सुरु केलेली असून दररोज सकाळी ५.०० ते रात्री १०.३० पर्यंत नागपूर रेल्वे स्टेशन ते दिक्षाभूमी २० फे-या जाणे व २० फे-या येणे अशी सेवा सुरु केलेली आहे. तसेच कामठी येथील ड्रॅगन पॅलेसवर लाखो बौद्ध अनुयायी येतात. या अनुयायांच्या सुविधेसाठी नागपूर महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ ची विशेष सेवा पुरविली जाणार आहे. ८ ते १० ऑक्टोबर दरम्यान दीक्षाभूमी व ड्रॅगन पॅलेस कामठी ही विशेष बस सेवा सुरू राहील. शहरात दाखल होणा-या अनुयायांसाठी मनपातर्फे ही विशेष सेवा सुरू करण्यात येत असून नागपुरात येणा-या बौद्ध अनुयायांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.
या मार्गावर मिळेल ‘आपली बस’ची सेवा
दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस व परत
दीक्षाभूमी ते अंबाझरी टी-पाईंट व परत
कपिलनगर ते दीक्षाभूमी व परत
नारा ते दीक्षाभूमी व परत
नागसेनवन ते दीक्षाभूमी व परत
यशोधरानगर ते दीक्षाभूमी व परत
आंबेडकर पुतळा ते दीक्षाभूमी व परत
रामेश्वरी ते दीक्षाभूमी व परत
भीम चौक ते दीक्षाभूमी व परत
वैशाली नगर ते दीक्षाभूमी व परत
राणी दुर्गावती नगर ते दीक्षाभूमी व परत
गरोबा मैदान ते दीक्षाभूमी व परत