स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पण दिना निमित्त म.न.पा. व्दारा अभिवादन

Date:

नागपूर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५३ व्या आत्मार्पण स्मृती दिना निमित्त शंकर नगर चैक स्थित स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला नगरीच्या वतीने मा. महापौर श्रीमती नंदा जिचकार, यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनिल हिरणवार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे सर्वश्री शिरिष दामले, डॉ. अजय कुळकर्णी, मुकुंद पाचखेडे, महादेवराव बाजीराव, अजय आचार्य, प्रा. प्रमोद सोवनी, डॉ. ‍दिनेश खुरगे,हिंदु महासभेचे रणजीत जोशी, अभिजीत जोशी, अक्षय वाघ, आशीष मुडे, अनंत पाध्ये, स्वातंत्र्यवीर सावरकर विदयानिकेतनचे प्रा. विजय सांतगे, संजय ठाकरे, सुभाष टिंगणे, चंद्रकांत क्षीरसागर, स्वा. सावरकरांचे वेशभुषेत सर्जेराव गलपट, म.न.पा. चे सहा. जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, राजेश वासनिक व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

चंद्रशेखर आजाद शहीद दिन दि. 27 रोजी

शहीद चंद्रशेखर आजाद यांच्या शहीद दिना निमित्त सेंट्रल एव्हेन्यू रोड स्थित चंद्रशेखर आजाद यांच्या प्रतिमेला मा. उपमहापौर श्री. दीपराज पार्डीकर हे दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.00 वाजता पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करतील.

अधिक वाचा : भारतीय हवाई दलाच्या दहशतवादी तळांवरील हल्याचे नागपुरात तरूणांकडून स्वागत

Abhijit
Abhijit
I do marketing and I have 3 passions: People, Travel and Social Media. I try to make articles more practical, full of great advice, inspiring ideas. I'm likely geeking out over, films, technology, sports, politics.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related